देखिला अक्षरांचा मेळावा
स्वयम्प्रभा प्रकाशन नांदेड, १९८६
किंमत :४५/रु.
मराठवाडा दैनिकाच्या रविवार पुरवणीत प्रकशित झालेल्या अक्षर संगत
या लोकप्रिय सदराचे ग्रन्थरूप.
फ़े.१९८४ मध्ये या सदरातील पहिला लेख प्रकाशित झाला व नंतर जवळजवळ
दीड वर्ष हे सदर येत होते.या लेखनाला सर्व महाराष्ट्रामधून उत्तम प्रतिसाद मिळाला.या लेखनाची लोकप्रीयता येवढी अभूतपूर्व होती की अनेक ठिकाणी
त्याचे सामूहिक वाचन होत असे...
"आमच्या सम्पूर्ण कम्पूलाच तुमचे लेखन कसे बेफ़ाम आणि आतून आवडते.
दर रविवारी पहिल्या पानावरील बातम्या वाचण्याआधी आम्ही या सदरावर तुटून पडतो.".........अं.वि. परांजपे.
या पुस्तकाचे नाव मी द्न्यानेश्वरान्च्या एका ओवीतून घेतले आहे.
परि तैसे हे नोहेचि देवा
देखिला अक्षरांचा मेळावा
आणि विस्मयाचिया जीवा
विस्मयो जाला.
देखिला अक्षरांचा मेळावा या पुस्तकास "वाल्मीक पुरस्कार" देणारे श्री.वामन देशपांडे यांनी "ललित"मधून लिहिले;
एका साक्षेपी रसिक वाचकाच्या मनावर पडलेले हे पुस्तकांचे पुनवी चांदणे आहे.पाडळकरांचे हे आधुनिक पद्धतीने रेखाटलेले तरुण शैलीदार आत्मचरित्र आहे...पुस्तकावर अपरम्पार प्रेम केले,लेखकावर अपरम्पार प्रेम केले,आणि वाचनाच्या य क्षणावर जबरदस्त प्रेम केले ,व जोडीला तुळसीव्रुंदावनापुढच्या
पवित्र रांगोळिसारखी शब्दांची रांगोळी रेखाटता आली ,तर निदान मी तरी असे
म्हणेन,या पुस्तकासारखे चिरंतन आनंद देणारे पुस्तक तयार होते..."
श्री.वसंत नरहर फ़ेणे लिहितात : "लेखन किती छोटे,पण अर्थवार्हित्व
किती मोठे...साम्प्रत तरी या लिखाणाला मराठीत तोड नाही.."
अनेक श्रेष्ठ लेखकांनी या लेखनाला मनमोकळी दाद दिली........
"तुमचे पुस्तक म्हणजे ग्रंथांच्या जगातून केलेला एक आल्हाददायक प्रवास आहे.
आपल्या वाचनात आणि चिंतनात वाचकांना सामील करून घेण्याचा हा प्रयत्न
खूप वेगळा आणि अभिनंदनीय आहे." वि.वा.शिरवाडकर
http://video.google.com/videoplay?docid=-9017736427369165152
या पुस्तकाच्या प्रस्तावनेतील काही भाग मझ्या आवाजात ऐकण्यासाठी
वर दिलेल्या दुव्यावर टिचकी मारा
आणखी प्रतिक्रिया पुढील वेळी.......