Saturday, October 13, 2007

पाउलखुणा


एके दिवशी मला एक स्वप्न पडले.
मी देवासोबत समुद्रकिनार्यावरून चालत होतो.देव मला माझ्या गत आयु्ष्यातील
प्रसंग दाखवीत होता.मी पाहिले:वाळूवर पावलांच्या दोन जोड्यांचे ठ्से उमटले
होते.पण मधूनच काही ठिकाणी मला फ़क्त पावलांच्या एकच जोडीचे ठसे दिसले.मी बारकाईने पाहिले तेव्हा मला आश्चर्य वाटले.कारण तो काळ माझ्या आयुष्यातील कठीण आणि दु:खदायक काळ होता.
मी म्ह्णणालो :परमेश्वरा,तू म्हणाला होतास की तू सतत माझ्या सोबतीने चालत राहशील.मग अशा आणीबाणीच्या प्रसंगी तू माझी साथ का सोडलीस बरे?
देव हसला,म्हणाला,:
प्रिय मुला,मी कधीच तुला सोडून गेलो नाही.जिथे तुला पावलांच्या एकाच जोडीचे ठसे दिसतात,ते माझ्याच पावलांचे आहेत.कारण तिथे मी तुला उचलून खांद्यावर
घेतले होते.............................................एक झेन कथा..

No comments: