Sunday, October 7, 2007

नदी" नदीच्या
मनी
डोकावुन पाहती
वाहती ढग

नदीच्या मनी
आपली कहाणी
पाहती ढग

नदीच्या मनी
जुन्या आठवणी
साहती ढग

नदीच्या मनी
श्रावण गाणी
गाती ढग

नदीच्या मनी
निरभ्र
आकाशातही
राहती ढग

No comments: