Monday, June 2, 2008

गुलजारान्च्या कवीता १} मोसम

पावसाळा येतो तेन्व्हा पाण्यालाही फ़ुटतात पाय
भीन्तीनाही टकरा देत ते गल्ल्यामधून धावू लागते
आणी उसळ्या मारू लागते जोराजोरात
खेळात जीन्कून आलेल्या मुलान्सारखे

खेळात जीन्कून जेन्व्हा येतात गल्लीतली मुले
कापडी बूट पायात घालून नाचत
उसळी मारणार्या चेन्डु प्रमाणे तेही
भीन्तीना टकरा देत धावू लागतात
पाण्याच्या लोन्ढ्या सारखे

No comments: