Monday, October 27, 2008

गुलजार त्रिवेनि

फ़क्त पाण्याचा आवाज झुळझुळतो आहे
घाट सोडून सारे नावाडी निघून गेलेत

चल चंद्राच्या नावेतून जलाशयाच्या पार जाउ.......

Wednesday, October 1, 2008

Tuesday, June 10, 2008

गुल्जार कविता

मोजून मापून काळ भरला जातो वाळूच्या घड्याळात
रिकामे झाले की त्याला उलटले जाते

आयुष्य सम्पल्यावर तो मला उलटे नाही का करू शकणार ?

Saturday, June 7, 2008

गुलजारान्च्या कविता ६

एक कविता माझ्या र्हुदयात अटकलेली आहे
ओळी अडल्या आहेत ओठावर
शब्द कागदावर उतरायला तयारच नाहीत
उडणार्या फ़ुलपाखरासा रखे.

केन्व्हा पासून मी बसून आहे जानम,
कागदावर तुझे नाव फ़क्त लीहून

बस,तुझे नावच पुरेसे आहे
याहून चान्गली कविता कोठली असेल ?

गुलजार कविता ५

माझ्यासमोर आले,मला पाहिले,माझ्याशी बोललेही
जुन्या ओळखीखातीर हसले देखील

कालचे वर्तमानपत्र होते,पाहीले,ठेवून दिले

गुलजार कविता ४

मोत्यान्चा हार तुटून जावा
तशा विखुरल्या आहेत ह्या दिवसरात्री

तू मला गुम्फ़ून ठेवले होते.

Thursday, June 5, 2008

गुल्जार कविता

३]

एक तम्बू लागला आहे सर्कस्चा
झोपाल्यावर झुलत राहतात कलाकार

मन कधी रीकामे नसतेच.

Monday, June 2, 2008

२} रेखाटण

आठ्वते का तुला
एके दीवशी माझ्या टेबलाशी बसून
सिगारेट च्या डब्यावर
तू एक चित्र रेखाटले होते
लहानश्या झुडुपाचे

येवून पाहा
त्या झुडुपावर एक फ़ूल उगवले आहे

गुलजारान्च्या कवीता १} मोसम

पावसाळा येतो तेन्व्हा पाण्यालाही फ़ुटतात पाय
भीन्तीनाही टकरा देत ते गल्ल्यामधून धावू लागते
आणी उसळ्या मारू लागते जोराजोरात
खेळात जीन्कून आलेल्या मुलान्सारखे

खेळात जीन्कून जेन्व्हा येतात गल्लीतली मुले
कापडी बूट पायात घालून नाचत
उसळी मारणार्या चेन्डु प्रमाणे तेही
भीन्तीना टकरा देत धावू लागतात
पाण्याच्या लोन्ढ्या सारखे

Friday, May 9, 2008

माझी नवी कादम्बरी.
प्रकाशक राजहन्स प्रकाशन, पुणे.


अप्रतीम
,सुन्दर
कलाक्रुती
....अरुण शेवते.

Wednesday, January 23, 2008

away from nanded

I am away from nanded up to 21st feb.
Will meet in the last week of feb.
Till then....
shesh shubh