Saturday, November 3, 2007

देखिला अक्षरान्चा मेळावा भाग २


देखिला..... वर आणखी काही प्रतिक्रिया...


वाचलेल्या पुस्तकांचा आनंद त्यातील ऊब तशीच ठेऊन नोंदणे हे फ़ार कठीण काम आहे.पण तुम्ही आपली आनंद हुरहुर आत्मीयतेने मांडली आहे...आपल्या जिव्हाळखुणा अगत्त्याने व सहजतेने मान्डल्या आहेत...जी.ए.कुलकर्णी.

डोस्तोव्हस्की टोलस्टोय,झ्वाइग,काफ़्का,आणि कोणकोण यान्च्या रंगीबेरंगी

काचांच्या तुकड्यासारखी जाळी आपल्या मनांत कुठेतरी आहे असे मला नेहमीच वाटत राहिले होते.तुमचे लेखन वाचल्यावर लगेच जाणवले की तीच जाळी जास्त स्पष्ट व स्वछ्छ स्वरूपात तुमच्याही मनात आहे.समानधर्मा भेटल्याचा आनंद

झाला................. प्रकाश संत

तुमचे पत्र व त्यासोबत धाडलेले टाचण पावते झाले.वाचून फ़ार बरे वाटले.
कुणी एक समानधर्मा मिळाल्याचा आनंद झाला.......गो.नी.दांडॆकर.

No comments: